उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था,उस्मानाबाद यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. 

  स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सभाग्रह, जिल्हा परिषद उस्मानाबाद या ठिकाणी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष मा.सौ.अर्चनाताई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

  महामानवांची जयंती साजरी करत असताना महापुरुषांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे तरुणाईने महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करावे व त्यांच्याविषयी असणारे विचार समाजात रुजावे युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा.या हेतूने स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था उस्मानाबाद यांच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. दोन गटात विभागून पारितोषिके देण्यात आले प्रथम शालेय गटातून विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे:-

1) प्रथम क्रमांक- कु. स्नेहल कमलाकर साळुंखे 2) द्वितीय क्रमांक-कु.मयुरी यादव

3) तृतीय क्रमांक-कु. मजिया मोमीन  उत्तेजनार्थ- श्रेया भोसले, सिद्धिविनायक शेटे, श्रद्धा देवकते, मानसी बागल व स्वानंदी पोतदार. महाविद्यालयीन गटातून विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे:-

1) प्रथम क्रमांक-अक्षय ईळके,सांगली. 2) द्वितीय क्रमांक-यश पाटील 3) तृतीय क्रमांक-हर्षवर्धन अलासे

उत्तेजनार्थ:- श्रुती बोरस्ते, मिथुन माने, अलिशा मोहिते, शिवम माळकर, अंबिका आगळे, ऐश्वर्या सक्राते.

  सर्व विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रा ने गौरविण्यात आले.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा मा.सौ.अर्चनाताई पाटील यांनी आपल्या मनोगत पर भाषणात सांगितले की,महापुरुषांची जयंती मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा वक्तृत्व स्पर्धां सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जयंती साजरी करणे म्हणजे खरी महापुरुषांना आदरांजली होऊ शकते तसेच यापुढेही अशा समाज उपयोगी स्पर्धांसाठी आपले नेहमी सहकार्य असेल असे त्यांनी सांगितले. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक श्री नेताजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अभिनंदन केले.तसेच वक्ता हाच भावी पिढीचा नेता असतो असे सांगितले. यावेळी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले प्रा.वैभव आगळे,श्री महेंद्र कावरे,श्री जळकोटे सर व श्री गुरव सर यांनी देखील मनोगत व्यक्त केले प्रा.आगळे यांनी आपल्या भाषणातून संयोजकांचे विशेष आभार मानले व पुढे सांगितले की आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी विशेष लक्ष घालून असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात घ्यावेत ही अपेक्षा व्यक्त केली. बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी स्वजनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, पांडुरंग पवार, देवकन्या गाडे, राहुल शिंदे,गणेश एडके, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले,जगदीश जोशी,प्रसाद मुंडे धनराज नवले,सार्थक पाटील,ज्ञानेश्वर सूळ,ओंकार देवकते,नवनाथ सोलनकर,ज्ञानेश्वर पडवळ,विद्या माने,ऐश्वर्या चौधरी,आदित्यराज इंगळे हे स्वजनहित संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.सचिन लोंढे यांनी केले,सूत्रसंचालन श्री.जगदीश जोशी यांनी केले तसेच आभार जयंती समितीचे अध्यक्ष श्री.स्वप्नील नाईकवाडी यांनी मानले.

    या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पारितोषिकं पासून इतर सर्व बाबीसाठी मदत करणारे मान्यवर आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीने प्रथम पारितोषिक 21000रुपये, दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या वतीने द्वितीय पारितोषिक 11000 रुपये,श्री प्रदीप उर्फ पप्पू शिंदे यांच्या वतीने 7000 रुपये व उत्तेजनार्थ बक्षीस श्री.नेताजी आबा पाटील 5000 रुपये देण्यात आले. तसेच श्री विलास लोंढे.श्री डॉ प्रशांत पवार,श्री विशाल पाटील,श्री सुरज शेरकर या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.


 
Top