उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतीला बारमाही रस्‍त्‍याची आवश्‍यकता असल्‍याने विविध योजनांच्‍या अभिसरणाच्‍या माध्‍यमातून रस्‍त्‍याची कामे करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.  “मी समृध्‍द तर गाव समृध्‍द आणि गाव समृध्‍द”  तर “माझा महाराष्‍ट्र समृध्‍द” या संकल्‍पनेमधून प्रमाणित दर्जाचे शेत आणि पाणंद रस्‍ते तयार करण्‍याकरीता मातोश्री ग्रामसमृध्‍दी शेत,पाणंद रस्‍ते योजना राबविण्‍यास मान्‍यता देण्‍यात आली आहे.  यामध्‍ये एका गावावरुन     दुस-या गावास जाणारे रस्ते, शेतावर जाण्‍याचे पाय मार्ग आणि गाडी मार्ग, आणि पांदण रस्‍ते कामांचा समावेश करण्‍यात आला आहे. जिल्हयातील मंजूर शेत आणि पाणंद रस्त्यांची कामे 15 जून 2022 पर्यंत पूर्ण करावेत,असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

   शासन निर्णयातील दिलेल्‍या सूचनेनुसार जिल्‍हयातून  एकूण 451 ग्रामपंचाती साठी एकूण 3822 कामे अंतर 6090.38 कि.मी. साठीचा आराखडा दि. 30 डिसेंबर 2021 शासनास सादर करण्‍यात आला होता.  त्‍यानुसार शासन निर्णय दि. 25 जानेवारी 2022 अन्‍वये 64 कामे अंतर 77.00 कि.मी., शासन निर्णय दिनांक 03 मार्च, 2022 नुसार 195 कामे, अंतर 249.50 कि.मी. आणि शासन निर्णय दि. 29 मार्च, 2022 नुसार 195 कामे,

 अंतर 232.30 कि.मी.  असे एकूण 454 कामे, अंतर 558.80 कि.मी. साठी मातोश्री ग्रामसमृध्‍दी शेत/पाणंद रस्‍ते कामांना शासनाने मान्‍यता प्रदान केली आहे. त्‍याचा तालुकानिहाय तपशिल पुढील प्रमाणे आहे.  तालुका, (कंसात)  मंजूर रस्त्यांची संख्या आणि कि.मी.उस्मानाबाद (94) 98 तुळजापूर (14) 15 उमरगा (63) 86 लोहरा (8)14.50,भूम (46) 72.50, परंडा (38) 53, कळंब (131)144, वाशी (60) 75.80, तसेच शासनाने  2021-22 साठी मान्‍यता देण्‍यात आलेल्‍या 64 रस्‍ते  कामांसाठी शासन पत्र दि. 03 मार्च 2021 अन्‍वये रक्‍कम  270.09 रुपये लक्ष तसेच शासन पत्र दि. 31 मार्च 2021 अन्‍वये रक्‍कम रु. 585.39 लक्ष असे, एकूण 855.48 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.   मातोश्री पाणंद आणि रस्‍ते योजनेतील मंजूर कामे  दि.15 जून, 2022 पर्यत पूर्ण करावयाची आहेत.

  याबाबत  रोहयो आणि फलोत्‍पदान मंत्री संदीपान भुमरे यांनी दि. 23 एप्रिल 2022 रोजी औरंगाबाद येथे विभागीय स्‍तरावर सर्व उपजिल्‍हाधिकारी (रोहयो), उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (मनरेगा), मातोश्री शेत व पाणंद रस्‍ते योजनेतील  तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती व उपअभियंता (बांधकाम)  यांची आढावा बैठक घेऊन मातोश्री समृध्‍दी  पाणंद शेत रस्त्याची कामे तात्‍काळ सुरु ती पूर्ण करणेबाबत सूचना दिलेल्‍या आहेत. तसेच याबाबत मंत्रालय मुंबई येथील अति.मुख्‍य सचिव (रोहयो), यांच्या देखील नियमित व्हिडीओ कॉन्‍फरन्‍स द्वारे आढावा घेतला जात आहे. दि. 25एप्रिल 2022 रोजी घेतलेल्‍या आढावा बैठकीत त्‍यांनी  या रस्त्यांची कामे  तात्‍काळ सुरु करुन दि. 15 जून, 2022 पर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे.

 या अनुषंगाने सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती,  सार्वजनिक बांधकाम आणि बांधकाम जि.प. उपविभाग तसेच सर्व संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाने मंजूर केलेली कामे सुरु करण्‍यासाठी प्रथमतः ग्रामपंचायतीनी 07 दिवसांत आत काम करणारी यंत्रणा निश्चित करुन घेऊन कामांना

 तांत्रिक आणि प्रशासकीय मान्‍यतेची कार्यवाही तातडीने करुन घेऊन मातोश्री ग्रामसमृध्‍दी पाणंद व शेत रस्‍ते कामे सुरु करण्‍यासाठी प्राधान्‍य द्यावयाचे आहे. आणि अति.मुख्‍य सचिव (रोहयो)  यांनी दिलेल्‍या सूचनेनुसारही ही कामे दि. 15 जून, 2022 पर्यंत पूर्ण करावीत जेणे करुन  हे रस्‍ते पावसाळयापूर्वी पूर्ण झाल्‍यास त्‍याचा दर्जा उत्‍तम राहील आणि याचा फायदा समस्‍त ग्रामस्‍थांना होऊ शकेल, असेही आवाहन जिल्‍हाधिकारी कौस्‍तुभ दिवेगावंकर आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्‍ता यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक व संदर्भात ग्रामपंचायतचे सर्व सरपंच यांना केले आहे.

 
Top