उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

 हरभरा खरेदी केंद्रावरील हरभरा वाहतुकीचे दर अन्य जिल्ह्याच्या वाहतुकीच्या तुलनेत कमी असल्यामुळे खरेदी केंद्र चालकांवर अन्याय होत आहे. सध्या सर्वत्र डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे सदरील दर हा न परवडणारा व खरेदी केंद्र चालकांवर अन्याय होणारा आहे. वाहतुकीचे दर वाढविण्याची मागणी खासदार अाेमप्रकाश राजेनिंबाळकर, अामदार कैलास पाटील यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली अाहे.

खासदार अाेमराजे म्हणाले, जिल्ह्यासाठी ४६.०४ रुपये वाहतुकीचे दर निश्चित केले आहेत. सदर वाहतुकीचा दर हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नजीकच्या बीड जिल्ह्याप्रमाणे ७१.२३ रुपये एवढा करण्याबद्दल सहकारमंत्र्यांकडे मंत्रालयातील दालनात भेट घेऊन विनंती केली. तसेच याबद्दल तातडीने मार्ग काढावा, अशीही मागणी करण्यात अाली. सहकारमंत्री यासाठी सकारात्मक असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.


 
Top