उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यापासून ते सर्कीट हाऊस शिंगोली पर्यंत ध्वजारोहणाच्या दिवशी उपद्रव तसेच आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येऊ नये म्हणून श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यापासून ते सर्कीट हाऊस शिंगोली पर्यंत दि.30 एप्रिल 2022 च्या रात्री 12 वाजेपासून दि. 1 मे 2022 चे रात्री 12 वाजेपावेतो  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी अविनाश कोरडे यांनी जारी केले आहे.

 दि. 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिन निमीत्ताने राष्ट्रध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा.पालकमंत्री महोदय यांचे शुभहस्ते सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, उस्मानाबाद येथे संपन्न होणार आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी विविध मागण्या संदर्भात लोक, संघटना, पक्ष, कार्यकर्ते हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, धरणे, मोर्चा, रॅली अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात.


 
Top