उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्रीपतराव भोसले  महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवत्तेत  चमकण्याचा आलेख वाढत असल्यामुळे गुणवत्ताक्रम वाढत आहे, शिवाय शैक्षणीक  क्षेत्रात याच महाविद्यालयाने उस्मानाबाद शैक्षणीक पॅटर्न यशस्वी केल्यामुळे ,    नीट व जेईईमध्ये उल्लेखनीय यश मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि. ६ एप्रिल रोजी दिली. 

श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयातील नीट, जेईईसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  ते बोलत होते. यावेळी प्रशासकीय आदित्य पाटील, प्राचार्य एस.एस देशमुख, उपप्राचार्य एस.के. घार्गे, प्रा.एन.आर.नन्नवरे, फोटॉन बॅच प्रमुख ए.व्ही.भगत, रिपीटर बॅचचे प्रमुख प्रा. डी.व्ही. पुजारी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर महाविद्यालयातील  इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील निकाल १८ विद्यार्थी हे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, जेईई, आयआयटी, एनआयटीसाठी पात्र झाले आहेत. यापुर्वी याक्षेत्रात विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी लातूर,पुणे, मुंबई व इतर ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागत होते. मात्र या महाविद्यालयाने सर्वच सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्यामुळे घवघवीत यश मिळुन ते नामांकीत शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पात्र ठरले. ग्रामीण भागातील वातावरणामुळे येथील विद्यार्थ्यांचा बुध्द्यांक चांगला आहे. मात्र आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे सुप्त गुणांना वाव मिळत नव्हता. दरम्यान, गुणवंत विदयार्थी पालक यांचा सुधीर पाटील उपस्थितांच्या हस्ते पेढा भरवून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

वैद्यकीय व अभियांत्रकी  प्रवेशासाठी पात्र विदयार्थी 

अमर उंबरे, श्रेयश गाढवे, अंकिता कुंभार, पंकज शिंदे, प्रतिभा यादव, साक्षी पवार, प्रतिक्षा लोमटे, दिया घार्गे, श्रुतीका माळाळे, पौर्णिमा निर्मळे, आदी काकडे, श्रावणी सातपुते अभय भिरंगे, सागर पाटील, तुषार उंबरे, शंतनु हिप्परगेकर,तनया दहातोंडे व मधुमती सदाफुले हे विदयार्थी वैद्यकीय व अभियांत्रकी  प्रवेशासाठी पात्र ठरले.  


 
Top