तुळजापूर / प्रतिनिधी-

 कोरोना पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षापासून बंद असलेल्या ग्रंथपालन कोर्स शासनाने सुरु करण्यास परवानगी दिल्याने ग्रंयपालन कोर्स करणाऱ्या विदर्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहीती वर्ग संचालक  श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी पञकार परिषद घेऊन  दिली.

 यावेळी पञकारांशी बोलताना सुर्यवंशी म्हणाले की, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघ व उस्मानाबाद जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग हा तुळजापुरात १९८५ म्हणजेच गेल्या ३७ वर्षापासून  पासून चालविण्यात येत आहे. ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग २०२० व २०२१ या दोन वर्षात राज्य शासनाने मान्यता न दिल्याने हे वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात बंद होते. परंतु यावर्षी राज्य शासनाने ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग चालू करण्यास मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने तुळजापूर येथे हा वर्ग एप्रिल ते जून या कालावधीत भरणार आहे. यासाठी किमान दहावी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला या वर्गात शिकण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाते. गेल्या ३०  वर्षात या वर्गातून सुमारे २ हजार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सार्वजनिक ग्रंथालय, महाविद्यालय, शाळा या ठिकाणी कार्यरत आहेत तर उर्वरित विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडविण्याचे कार्य या वर्गाने केले आहे. या वर्गाचे वर्ग व्यवस्थापक म्हणून जिल्हाअध्यक्ष ग्रंथमित्र व.ग. सुर्यवंशी हे आजही काम पहातात. याकामी ग्रंथालय संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांचे बहुमूल्य सहकार्य आहे .या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सात दिवसात संपर्क करावा व आपला प्रवेश निश्‍चित करावा असे आव्हान वर्ग संचालक श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले. प्रास्ताविक गोविंद खुरूद यांनी केले . यावेळी वर्ग शिक्षक विनायक मस्के ,महेश चोपदार ,हेमंत कांबळे, उपस्थित होते.

 
Top