उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा व क्यू आर कोड उद्घाटन व वितरणाचा कार्यक्रम माझी ग्राम विकास मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य सरकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन अध्यक्ष बापूराव पाटील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे उस्मानाबाद नगरपालिकेचे माजी अध्यक्ष नानासाहेब पाटील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता उस्मानाबाद बालाजी सावतर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मार्गदर्शक व व तज्ञ संचालक एच व्ही भुसारे यांनी केले .  वास्तुविशारद तज्ञ शिवानंद नकाते तसेच संस्थेचे सदस्य दत्तप्रसाद जंगम सर विस्ताराधिकारी एम पी एस सी परीक्षेत उपशिक्षणाधिकारी या पदासाठी पास झाले म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला तसेच प्रतिवर्षी 8 मार्च महिला जागतिक दिन सरकारी दवाखान्यात जन्म घेतलेल्या मुलीच्या नावानी रक्कम रुपये 5000 ठेव पावती व प्रसद माताचा साडीचोळी देऊन सन्मान केला जातो याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दुवा फरीद सय्यद या जन्मलेल्या मुलीचा व प्रसूत माता  सय्यद यांचा सत्कार करण्यात आला.  आदर्श महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ जयश्री हनुमंत भुसारे यांना सक्षम महिला अध्यक्षाचा पुरस्कार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व बसवराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आला

कार्यक्रमाच्या समारोप  कार्यक्रमाचे अध्यक्ष  काकासाहेब कोयटे यांनी कला.  कार्यक्रमास  पाध्यक्ष सौ सविता रमेश कोरडे, सचिव  संजीवनी त्रिंबक कपाळे तसेच संस्थेच्या संचालिका  अनिता सतीश चिल्लाळ, राजश्री महेश करजखेडे,  संगीता प्रशांत स्वामी, संगीता विनय नकाते ,  संगीता बाबासाहेब तीर्थकर, नंदा बालाजी घाडगे, सुरेखा रविंद्र कसबे उपस्थित होते.  तसेच संस्थेच्या व्यवस्थापिका सौ सविता विभुते व सर्व कर्मचारी वर्ग निमंत्रित संस्थेचे पदाधिकारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे मार्गदर्शक व तज्ञ संचालक त्र्यंबक कपाळे यांनी केले. 

 
Top