उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्र सरकारच्या नीती आयोगाने सुरू केलेल्या अटल टिंकरिंग लॅबचे  उस्मानाबाद जिल्ह्यातील येवती येथील भटक्या विमुक्तांसाठी चालवल्या जात असलेल्या समर्थ आश्रम शाळेत आज 6 एप्रिल रोजी   उद्योगपती राजकिशोर मुंदडा यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमाला भाजपा विधी आघाडी महाराष्ट्र चे संयोजक एडवोकेट मिलिंद पाटील , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्या भारती चे पश्चिम क्षेत्र संघटक श्री शेषाद्री डांगे, लोकसेवा समितीचे सचिव श्री कमलाकर पाटील , भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठानचे डॉक्टर शहापूरकर , लोकसेवा समितीच्या संचालिका सौ सुचिता जयंत पाटील, सौ  सरला मुंदडा, लोकसेवा समितीचे हितचिंतक श्री जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर आयवले  यांच्या प्रस्तावनेने झाली. प्रास्ताविकात श्री आयवले यांनी निती आयोगाच्या निर्देशानुसार सुरू झालेली अटल टिंकरिंग लॅब इनोव्हेटिव्ह असुन  याचा वापर करून वैज्ञानिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना करावा लागणार असून वैज्ञानिक तंत्रज्ञानावर आणि इंजीनियरिंग दृष्ट आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार असल्याचं सांगितलं. तर श्री कमलाकर पाटील यांनी या अटल टिंकरिंग लैब मूळ विद्यार्थ्यांना वैज्ञानिक शोध लावण्यास तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक जाणिवा विकसित होण्यास मदत होणार असून शिक्षकांनी त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. लोकसेवा समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर अभय शहापूरकर यांनी टिंकरिंग म्हणजे हाताळणी करणे , मुलांमध्ये असणारी नैसर्गिक जिज्ञासा आणि जाणिवा जागृत करून त्यांना वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ करण्याचा ह्या अटल टिंकरिंग लॅबमुळे प्रयत्न होणार असल्याचं सांगितलं. ही बाब म्हणजे समर्थ  आश्रम शाळेचे वैभव असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि गुरुजनांनी ते टिकून राहावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केलं.

तर शेषाद्री डांगे यांनी टिंकरिंग लॅब मुळ येवती परिसरातील शाळांना  उपयोग होणार असून नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकसित करण्यावर भर दिला असून विद्यार्थ्यांची कौशल्य उपजत असणारी विकसित होण्यास यामुळे मदत होणार  असल्याचं सांगितलं.

निती आयोगाच्या निर्देशानुसार सुरू झालेल्या या अटल टिंकरिंग लैब मूळ भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक उत्तरे शोधण्यासाठी आधुनीक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे.  केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणल्यानंतर त्यात कौशल्य विकासावर भर देण्यात आला असून विद्यार्थ्यांची तंत्र  कौशल्य विकसित करण्यास या अटल टिंकरिंग लॅब चा निश्चितच उपयोग होईल अशी अपेक्षा यावेळी उद्योगपती राजकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केली.  विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणितीय कौशल्यांचा वापर करून जाणीव जागृती करून वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ करण्याचा प्रयत्न यामधून व्हावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तर एडवोकेट मिलिंद पाटील यांनी या आश्रम शाळेतून उद्योजक वैज्ञानिक निर्माण व्हावेत आणि येवती  परिसरातील पालकांच स्वप्न विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात उद्योजक श्री राजकिशोर मुंदडा यांनी संस्थेला एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. येवती परिसरातील मुला मुलींना शिक्षणाची सोय करून दिल्याबद्दल एडवोकेट मिलिंद पाटील यांचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आभार श्री प्रमोद देवकर यांनी मानले

 
Top