उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजातील उपेक्षित -वंचित घटकात जाऊन सेवा भावातून सामाजिक न्याय जपावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री.उमाकांत मिटकर यांनी डॉ.बापूजी साळुंखे व्याख्यानमालेत केले.

यावेळी डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्था यांच्यात सामंजस्य करार संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.श्री.व्ही.जी.शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून वात्सल्य सामाजिक संस्थेचे श्री.उमाकांत मिटकर होते.

यावेळी मिटकर यांची ‘सामाजिक न्याय व सेवाभाव’या विषयावर मांडणी झाली.मिटकर म्हणाले की सामाजिक क्षेत्रात असंख्य अडचणी,प्रश्न आहेत,शासकीय स्तरावर त्या सोडवण्यासाठी मर्यादा येतात.अशावेळी लॅा चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्नरत रहावे.श्री.मिटकर यांनी त्यांच्या सामाजिक कामात आलेले अनेक अनुभव निवेदन करून विद्यार्थ्यांना प्रश्नांची जाण निर्माण करून दिली.

 डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व वात्सल्य सामाजिक संस्थेमध्ये पुढील पाच वर्षासाठी सामाजिक विषयावर काम करण्यासाठी सामंजस्य करार झाला.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री.शाहूराज खोगरे,डी.न्यूजचे संपादक श्री.लक्ष्मण दुपारगुडे,प्रा.बारकुल,प्रा.मडके, प्रा.शाह,डॉ.गोलवाल, डॅा.स्मिता कोल्हे,प्रा.चंदनी घोगरे,प्रा.महिंद्रकर,प्रा.अजित शिंदे,श्री.बागल व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नितीन कुंभार तर आभार प्रदर्शन प्रा.संजय आंबेकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 
Top