तुळजापूर (प्रतिनिधी) 

तालुक्यातील किलज येथे   तालुका कृषी आधिकारी कार्यालय तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी कार्यालय नळदुर्गच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजन २०२२ अंतर्गत माती परीक्षण, बियाणे उगवण क्षमता तपासणी, BBF ने पेरणी,टोकन पध्दतीने लागवड,MREGS,महा डी बी टी यांसह शेती विषयक विविध विषयांवर चर्चां व माहिती देण्यात आली.खरीप हंगामातील पेरणी पूर्व तयारी व खरीप हंगाम ग्रामविकास आराखडा बाबत बैठक संपन्न झाली.

बैठकीत खरीप हंगामातील पिक पेरणी पूर्व तयारी संदर्भात ग्राम विकास कृषी आराखडा बाबत चर्चा झाली.विशेषतःखरीप हंगामातील सोयाबीन पिकाची पेरणी करण्यासंदर्भात किलज येथील कृषी सहाय्यक संतोष रंदवे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी  येथील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

 
Top