उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील महात्मा फुले चौकात थोर समाजसुधारक, स्त्री उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, युवा नेते उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, कानिफनाथ देवकुळे, युवक काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस स्वप्नील शिंगाडे, उपाध्यक्ष कफिल सय्यद, मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्रेम सपकाळ, अशोक बनसोडे, संतोष पेठे, शहर सरचिटणीस संजय गजधने, उपाध्यक्ष आरेफ मुलानी, महादेव पेठे, सेवा दलाचे अतुल चव्हाण, अहमद चाऊस, शिवाजी पेठे, राजू आडे, फरीद पीरजादे, प्रसन्न कथले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
Top