उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला असून कळंब तालुक्यातील हासेगाव येथील 50 वर्षीय शेतकरी लिंबराज तुकाराम सुकाळे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

शेतात काम करत असताना सुकाळे यांना चक्कर आली त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेहण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू उष्माघाताने झाल्याचे डॉक्टरांनी  स्पष्ट केले आहे.उष्माघाताचा मराठवाड्यातील हा पहिला बळी असून उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 अंशावर गेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

 
Top