उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सध्या असलेले स्त्री रूग्णांलय अपुरे पडत असून त्यामुळे वाढीव ६० खाटांचे स्त्री रूग्णालय नव्याने सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात येईल, अशी मािहती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

उस्मानाबाद जिल्हयाचे नाव आकांक्षित जिल्हयात आल्यापासून केंद्र सरकारच्या वतीने विविध योजना जिल्हयात राबविल्या जात आहेत. या संदर्भातील माहिती घेण्यासाठी  १७ व १८  एप्रील २०२२ रोजी डॉ.भारती पवार यांनी जिल्हयाचा दौरा केला. त्यानंतर विविध ठिकाणी भेटी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक ही घेतली. सोमवारी दि. १८ एप्रील रोजी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीने जोडण्यासाठी गेल्या दो वर्षांत जिल्हया अनेक योजना राबविल्या. कृषी विभाग, सिंचन विभाग, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, मुद्रा योजना यासारख्या योजना जिल्हयात राबविल्या जात आहेत. केंद्र सरकार ने राबविलेल्या योजनामुळे बालमृत्यूचे प्रमाण ९.३१ वरून ५.३ वर आले आहे. तर सुरक्षीत प्रसूतीचे प्रमाण ८७ टक्क्ेयावरून ९९ टक्क्यावर आले आहे. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनाचे जिल्हयात ७५ हजार कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. ते  ४ लाखापर्यंत वाढविण्यात येणार आहेत. यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, िज.प.च्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यावेळी उपस्थित होत्या. 

जागा निश्चित करा

आयुष हॉस्पीटलसाठी प्रशासनाने जागा निश्चित केल्यापास लवकरच आयुष हॉस्पीटल चालु करण्यात येईल. सध्या १८ ते २२ एप्रील पर्यंत सर्वत्र आरोग्य मेळावा घेण्यासाठी सर्वत्र खास निधीची व्यवस्था करून देण्यात आली आहे, असे सांगून भारती पवार यांनी प्रधानमंत्री डायलेसीस योजनेच्या अंतर्गत जिल्हयात ४ मशिन दिल्या आहेत. तर पैकी बंद पडलेल्या २ मशिन चालू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ओमायक्रॉनचा परिणाम जानवणार नाही

जगात ओमायक्रॉनमुळे लॉकडाऊनची स्थिती आली तरी भारतात अशी परिस्थिती येणार नाही, असे सांगून डॉ.भारती पवार यांनी देशात ८६ टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम चांगला दिसून येत आहे. जागतीक आरोग्य संघटने पेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जास्त समजते. या खासदार संजय राऊत यांच्या विधाना विषयी डॉ.भारती पवार यांनी या विषयाला राजकीय वळण लावू नका, संशोधन व विज्ञानाच्या आधारावर केंद्र सरकार निर्णय घेते , असे सांगितले. वीज प्रश्नासंदर्भा बोलताना डॉ.भारती पवार यांनी कोळसा कोरोना प्रतिबंधक लस केंद्र सरकार ने वेळेवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत, असे असताना ही राज्य सरकार केंद्रावर विनाकारण टीका टिप्पणी करीत असेत. या प्रकारची द्वेष भावना सोडावी, अशी टिप्पणी डॉ.भारती पवार यांनी केली. 


  अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी सोमवार िद.१८ एप्रील रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत केंद्र सरकारच्या कांही योजना जिल्हयात न राबविल्यामुळे कांही अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला तर केंद्र सरकार ने आरोग्य विभागासाठी दिलेला निधी परत गेल्यामुळे कांही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 


 
Top