उस्मानाबाद / प्रतिनिधी-

    गौरव साहित्यालय, सोलापूर यांनी प्रकाशित केलेले उस्मानाबाद येथील साहित्यिक युवराज नळे यांचे सहावे पुस्तक “सूर्यास्त” या मराठी कथासंग्रहाचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार व आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी भारतीताई पवार व राणा जगजितसिंह पाटील यांनी साहित्य क्षेत्रातील युवराज नळे यांच्या योगदानाबद्दल कौतुक करून पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राजसिंह राजेनिंबाळकर, इंद्रजित देवकते, लक्ष्मण माने, सुनील काकडे, मोहन मुंडे, प्रमोद बचाटे, ॲड.कुलदिपसिंह भोसले, वैभव हंचाटे इत्यादी उपस्थित होते.


 
Top