मुरूम (प्रतिनिधी) : 

येथील सहा वर्षाच्या या चिमुकल्याने कडक असा रमजानचा उपवास (रोजा) धरला होता. सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. 

या महिन्यात महिनाभर उपवास धरत अल्लाहची इबादत करत असतात. इस्लाम धर्मीयांमध्ये ७ वर्षानंतर रोजा पकडणे अनिवार्य असते. मात्र मुरुम येथील मिर्झा प्लॉट भागातील सहा वर्षीय अब्बासअली इसाली चाऊस याने आपल्याला देखील रोजा धरावयाचा आहे, असा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे केला. यंदाचं रमजान महिना कडक उन्हाळ्यात आला आहे, त्यात अब्बासअली हा फक्त सहा वर्षपूर्ण झाली आहेत. म्हणून त्याचे आई-वडील त्याला नकार देऊ लागले. परंतु दोन-तीन तास उपाशी राहून रोजा सोडेल या उद्देशाने त्याला रोजा करण्यास सांगितले. मात्र  त्याने पूर्ण १६ तास अन्न-पाण्याविना ५ वेळेसच्या नमाजसह रोजा पूर्ण केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे.

 
Top