तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील काक्रंबा येथे हनुमान जयंती निमित्त काक्रंबा चषक या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ( ग्रामीण ) शुभारंभ दिनांक   ९ एप्रील  पासून  आरंभ होणार  आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख  लाखो रुपयांचा रकमेसह चषक देवुन गौरविण्यात येणार आहे.

 या स्पर्धेचे उद्घाटन  आ.  राणाजगजितसिंहजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धतील प्रथम विजेत्यास ५१हजार रुपये व चषक,   अनिल  बंडगर ( उपसरपंच), उपविजेत्यास  ३१००१ / -रूपये व चषक   ॲड . नागनाथ   कानडे,  तृतीय पारितोषिक १५००१ / -रूपये व चषक  अॅड. निळकंठ  वट्टे यांच्या तर्फ देण्यात येणार आहे. तसेच सलग तीन षटकार ,चौकार हँट्रीक सामनावीर मालिकावार उत्कृष्ट संघ गगनचुंबी षटकार यासह अनेक स्पर्धकांना रोख रकमेचे पारीतोषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फि अडीच हजार रुपये आहे. या स्पर्धेत  गिराम क्रिकेट मैदान व्हानाळा रोड काक्रंबा येथे होणार असुन ज्या संघाना सहभाग नोंदवायाचा आहे त्यांनी आपले नावे ७ एप्रील 2022पर्यत नोंदवावेत, असे आवाहन आयोजक जय हनुमान क्रिकेट कल्ब काक्रंबा यांनी केले आहे.

 
Top