उस्मानाबाद / प्रतिनिधी :-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अर्थसहाय्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  यश मेडिकल फाउंडेशन आयोजित व्यसनमुक्ती संगीत रजनी कार्यक्रम मंगळवार (दि .12 एप्रिल रोजी सायकाती ७ वाजता येरमाळा येथील येडाई व्यसनमुक्ती केंद्र मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन   यश मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप तांबारे यांच्या हस्ते  करण्यात आले.

  कार्यक्रमात व्यसनमुक्ती गाणी ,देशभक्तीपर गाणी ,फिल्मी गाणी   विनोदातून प्रबोधन प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली.

या कार्यक्रमात कॉन्फिडन्स  फाउंडेशनचे कलाकार रोहित देशमुख , श्रावण बोराडे , प्रतिभा लठ्ठे  ,श्रीकुमार कोळपकर  ,शांती गोरे  ,कमलेश बोधक गायनाचे काम विनायक बोकेफोडे माधुरी कुलकर्णी  नानासाहेब देशमुख  ,कोबळे यांनी केले.      

कार्यक्रमातून लोकप्रबोधन असल्याने नागरिकांनी या कार्यक्रमास टाळ्या व शिट्या वाजवून दाद देत होते.    कार्यक्रमासाठी  परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश मेडिकल फाउंडेशन च्या सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top