तुळजापूर / प्रतिनिधी-

  प्लास्टिक बंदी पार्श्वभूमीवर  शहरातील विविध प्रासादीक दुकांनावर धाडी टाकुन  ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व ८ इंच बाय १२ इंच आकारापेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यां विकणा-या व्यापाऱ्यांनकडून १२० प्लास्टिक कँरीबँग  जप्त करण्यात आल्या आहेत. शुक्रवार िद. १५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपार पर्यंत नगर परिषद च्या पथकाने अंदाजे १२० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.

ही कारवाई  कार्यवाही प्रशासक योगेश खरमाटे,  मुख्यधिकारी अरविंद नातु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीत वैभव पाठक (कार्यालयीन अधिक्षक),(कर निर्धारक) रणजित कांबळे,(स्वछता निरीक्षक) दत्तात्रय साळूंके,(शहर समन्वयक) सुशांत गायकवाड ,राजाभाऊ सातपुते,व्ही.एस. मोटे,गुणवंत कदम(बिट प्रमुख),लखन कंदले व स्वच्छता विभागातील इतर कर्मचारीयांचा सहभाग होता. 

 
Top