उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथे विविध विकास कामांचा व लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या पिठाच्या चक्कीचा लोकार्पण सोहळा खा. ओमराजे निंबाळकर यांचे हस्ते संपन्न.  

दहिटणा ग्रामपंचायतच्या वतीने गावकऱ्यांच्या सोयीसाठी केलेल्या वॉटर एटीएम, हायमस्ट लॅम्प, पिण्याच्या पाण्याची टाकी, दलित वस्ती समाज मंदिराचे करण्यात आलेल्या नूतनिकरनाचे यांसह अन्य विकास कामांचे तसेच लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या पिठाच्या चक्कीचे लोकार्पण खासदार मा.ओमप्रकाश जी राजेनिंबाळकर हस्ते जिल्हा प्रमुख तथा आमदार श्री. कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

याप्रसंगी बोलताना, तुळजापूर तालुक्यातील आजच्या विकासकामांचे झालेले उद्घाटन हे खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाचे काम असून तळागाळातील जनमाणूस फक्त शिवसेना पक्षातच आमदार - खासदार होऊ शकतो. आम्ही आणि आमचे सर्व सहकारी कायम आपल्या सर्वांच्या सुखदुखात सोबत असून या भागाच्या आणि या तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे देखील आश्वासन याप्रसंगी खा.राजेनिंबाळकर यांनी दिले.

गावात विकासाच्या योजना राबवून सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावणे आणि आपले गाव हे आपले कुटुंब समजून विकास कामांचा धडाका लावणारे व कमी कालावधीत सामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदैव कार्यशील असणारे गावचे उपसरपंच सोमनाथ गुड्डे यांच्या कार्याचे कौतुक केले. या तालुक्याचा लोकप्रतिनिधी नसलो तरीही गावं तिथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असेन, अशी ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली.अत्यंत आपुलकीने आणि उत्साहात दहीटण्याच्या नागरिकांनी स्वागत केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्‍हाण, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख अमीर शेख, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके, माजी उपसभापती श्याम जाधव, सरदारसिंह ठाकुर, नळदुर्गचे शहरप्रमुख संतोष पुदाले, अमोल गवळी, राजू जाधव, आप्पासाहेब बिराजदार, सोमनाथ गुड्डे, रोहित चव्हाण, सचिन मोरे, विकास सूरवसे, ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top