उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नाशिक येथील सक्षम पोलिस टाईम्स यांचा राज्यस्तरीय सक्षम दिव्यांग उद्योजक योध्दा पुरस्कार उस्मानाबाद (वाघोली)येथील मयुर ज्ञानेश्वर काकडे यांना दि . १६ एप्रिल रोजी नाशिक येथे एका समारंभात नाशिकचे पोलिस महानिरीक्षक बी . जी . शेखर यांच्या हस्ते प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर ज्ञानेश्वर काकडे यांना सक्षम दिव्यांग योध्दा हा पुरस्कार नुकताच देण्यात आला . 

यावेळी आयोजक सक्षम पोलिस टाईम्सचे संपादक विलास पाटील व मान्यवर उपस्थित होते.  महाराष्ट्रातील राज्यातील 5 दिव्यांग व्यक्तींना हा पुरस्कार  देण्यात आला. दि . १६ एप्रिल रोजी सायंकाळी संभाजीमहाराज चौक नाशिक येथे एका समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला . राज्यभरात इतर पुरस्कार खुप मिळाले पण हा पुरस्कार दिव्यांग उद्योजक म्हणून मिळत आहे म्हणजे खुप मोठी कौतुकाची थाप पाठीवर पडली आहे . गेल्या 10 ते 12 वर्ष समाजातील दिव्यांग व्यक्तींची सेवा केली आणि यापुढेही  यशस्वी उद्योजक होऊन इतरांना प्रेरणा मिळेल असे कार्य करून दाखवणार आहे .  त्यातुन आणखी उद्योजक तयार होत आहेत . स्वतःच्या  कमाईतुन अनेकांना आर्थिक मदत करत आहेत . हा पुरस्कार मला मिळाला याचा मनस्वी आनंद होत आहे असे जिल्हाध्यक्ष मयुर ककडे यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले .

मयुर काकडे यांनी बोलताना सक्षम पोलिस टाइम्स समूहाने दिव्यांग उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती दिली आहे. सातत्याने परिश्रम करून मिळालेल्या यशाचा आनंद या पुरस्काराने द्विगुणित झाला आहे. या पुरस्कारामुळे समाजातील नामवंतांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. ‘सक्षम पोलिस टाइम्स’च्या प्रत्येक घटकाने माझे केलेले अनोखे स्वागत कायम स्मरणात राहील. या पुरस्कारामुळे विविध व्यवसायांच्या माध्यमातून काम करण्यास भविष्यात अधिक ऊर्जा मिळणार आहे असे सांगितले तसेच पुरस्कारामुळे आनंदाबरोबर जबाबदारी वाढल्याचीही जाणीव झाली आहे.आपल्या संघटन कार्यातून अनेक अंध,अपंग विधवा, शेतकरी,यांच्यासाठी आंदोलन ,शाखा,मेळावे घेत महाराष्ट्रभरात आणि पार दिल्ली पर्यंत उस्मानाबादचा झेंडा रोवला आहे

ज्या व्यक्तीमुळे हा पुरस्कार मिळाला ते संध्याताई जाधव ,विलास पाटील,वैशाली पाटील,ज्योती रामोले,सुनील निकम,राधिका परब,अभयजी पवार,बन्सी डोके,कविता पवार,संतोष कारले सर या सर्वांचे आभार मयुर काकडे यांनी मानले

 
Top