तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ भाविकांच्या वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर  मंदीर प्रशासनाने  १४  एप्रिल पासुन   मंदीर   पहाटे

 एक वाजता चरणतिर्थ होवुन  धर्मदर्शनार्थ खुले करण्याचा   निर्णय  घेतल्याने  भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच चैञी पोर्णिमा याञा उत्सव काळात   भाविकांना दर्शन सुलभरित्या व्हावे म्हणून  श्री देविजींचे चरणतिर्थ पहाटे ०१.०० वाजता करण्यात येऊन अभिषेक पुजेची घाट सकाळी ०६.०० वाजता करण्यात येईल . दसदरील बदल हे दिनांक १५ जून २०२२ पर्यंत अंमलात राहणार आहे.

सध्या दररोज भाविकांची गर्दी होत असल्याने बुधवार, गुरुवार,  सोमवार , शनिवार या दिवशी ही मंदीर  ३ वाजता दर्शनार्थ उघडावे, अशीही मागणी होत आहे.

मंगळवार रोजी देवीदर्नशनार्थ भाविक पहाटे मोठ्या संखेने आले. परंतु प्रशासनाने मंदीर एकला उघडणे गरजेचे असताना चार वाजता उघडले याचा परिणाम अँक्सेस पास भवानी रोडवर आली व सकाळी एकच गर्दी होवुन भाविकांना सुलभ दर्शन मिळाले नाही या पार्श्वभूमीवर वृत्तपञ व विविध संघटनांनी मंदीर खुले लवकर करण्याची मागणी केल्यानंतर अखेर  मंदीर प्रशासनाने निर्णय घेतला .

 
Top