काटी (प्रतिनिधी) :  

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील काटी सज्जाचे तलाठी प्रशांत प्रभाकर गुळवे यांनी 10 मीटर रायफल व पिस्तुल या प्रकारात सिल्व्हर मेडल पटकावले. 

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे शनिवार दि. 2 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या आर्यमान शुटींग स्पोर्ट्स क्लब आयोजित  तिसरी 2022  मैत्री चषक शुटींग  रायफल व पिस्तुल क्रीडा प्रकारात उस्मानाबाद जिल्हा रायफल क्लब संघाकडून खेळून तुळजापूर तालुक्यातील काटी सज्जाचे  तलाठी प्रशांत गुळवे यांनी 400 पैकी 372 गुण  मिळवून सिल्व्हर पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यभरातून 250 खेळाडूनी सहभाग घेतला होता. त्यांना हेमंत जाधव सातारा, अझीम शेख, उस्मानाबाद, व प्रमोद माळी,बार्शी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top