उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सार्वजनिक भीम जयंती उत्सव मंडळ कौडगांव  यांच्या वतीने विश्वरत्न  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  कौडगांव   येथील इयत्ता पहिली ते आठवी मधील  सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्या, पेन ,पट्टी ,पेन्सिल व शालेयउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

 तसेच Covid-19 च्या कार्य काळामध्ये योगदान देणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,चार अंगणवाड्या यांना बाबासाहेबांच्या प्रतिमा भेट देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सचिन हरिभाऊ थोरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्याम कुलकर्णी,  सरपंच प्रतिभा  बालाजी सुतार , सामाजिक कार्यकर्ते मृत्युंजय माणिक बनसोडे, तसेच कार्यक्रमाला उपस्थित मंडळाचे अध्यक्ष मारुती हारिभाऊ अंकुशराव, उपाध्यक्ष विशाल मस्के, सचिव गणेश शिवाजी माने, उपसचिव सचिन चंद्रकांत गायकवाड, मार्गदर्शक संदीप वैजनाथ अंकुशराव, रणजीत शिवाजी माने, आयोजक तानाजी पंढरी नितीन यशवंत अंकुशराव ,खजिनदार नामदेव  भागवत अंकुशराव,सदस्य:- अमर भारत मस्के, सागर माने ,मारुती देडे  ,आप्पा बब्रुवान मस्के,  बालाजी अंकुशराव आदींची प्रमुख उपस्थिती होती . 

 
Top