तुळजापूर / प्रतिनिधी  

तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळसारोहनच्या पार्श्वभूमीवर कळसाची शहरातुन भव्य शोभायाञा काढण्यात आली.

बुधवार दि २७रोजी सकाळी  तुळजापूर खुर्द येथील माहेरवाशिणी (लेकींच्या) हस्ते कलशासह जलयात्रा तुळजापूर शहरातून उंट, घोडे, भजनी मंडळ,गोंदळी,आराधी मंडळ, धनगर ढोल मंडळ, वारूवाले, रथा मध्ये कळस ठेवून पापनाश नगर येथून काढुन  सुरुवात करण्यात आली 

 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भवानी रोड महाद्वार,  आर्य चौक, कमान वेस मार्गे तुळजापूर(खुर्द) येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात याचा समारोप झाला.

 यावेळी तुळजापूर(खुर्द)येथील नागरिक,महिलां, अबाल वृद्ध व युवक,बालक यांच्या उपस्थित होते.

 
Top