उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आशाबी बाबुलाल तांबोळी, रा. उस्मानाबाद या मयत झाल्या असतानाही इशरतजहॉ लालमुहम्मद शेख यांनी मध्यवर्ती शासकीय इमारत, उस्मानाबाद येथील सह दुय्यम निबंधक यांच्यासमोर त्या जिवंत असल्याचे व त्यांचे कुलमुखत्यार पत्र आपल्या नावे असल्याचे प्रतिज्ञा पत्रात जाणीवपूर्वक खोटे कथन केले.

या प्रकरणी  कार्यालयीन कर्मचारी- रविकांत डहाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नोंदणी अधिनियम कलम- 82 सह भा.दं.सं. कलम- 181 अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाणे  येथे  गुन्हा नोंदवला आहे.

 
Top