उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी   येथील ग्रामदैवत श्री येमाई देवी मंदिरास धनंजय  रणदिवे मित्रमंडळाच्या वतीने यात्रेनिमित्त दोन लॅम्प (फोकस) भेट देण्यात आले आहेत.

यात्रेनिमित्त भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते हे लॅम्प शनिवारी (दि.२३) सुपूर्द करण्यात आले. श्री. पाटील यांनी ग्रामस्थांच्या अडी-अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली. तर सारोळा, काजळा नंतर आता राजुरी येथेही विविध विकासकामे करण्याचे आश्वासन श्री. रणदिवे यांनी दिले. यावेळी जेष्ठ नेते भारत पाटील, उपसरपंच गणेश घोगरे, भाजपा नेते राजाभाऊ इंगळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष तथा चिखली ग्रामपंचायतचे सदस्य तेजस सुरवसे, संजय इंगळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश इंगळे, सुशील पाटील, समाधान इंगळे, भाजपाचे शाखाध्यक्ष काकासाहेब इंगळे, रमेश इंगळे, सुधाकर तावरे, अमित इंगळे, तुकाराम इंगळे, अतुल इंगळे, अमोल इंगळे, लहू इंगळे, मनोज पाटील, प्रा. बाजीराव जाधवर, मेजर बाळासाहेब इंगळे, संतोष इंगळे, भाऊराव भिसे, व्यंकट इंगळे, पत्रकार शाहरुख सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top