उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कवयित्री भाग्यश्री रवींद्र केसकर यांच्या ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’  या काव्यसंग्रहाला विविध नामवंत संस्थांचे सहा राज्यस्तरीय व एका राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने कवयित्री भाग्यश्री केसकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, रवींद्र केसकर, धनंजय रणदिवे, रवी कोरे, लक्ष्मण माने यांच्यासह समितीचे  अन्य पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

 

 
Top