तुळजापूर  / प्रतिनिधी-

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमा सोहळ्यात चैञी पोर्णिमा दिनी नगरपरिषद ने मंदीर महाध्दार व मंदीरांनकडे येणाऱ्या मार्गावरील रस्त्यावर पडलेला पन्नास टन कचरा चोवीस तासात उचलला.

 चैञी पोर्णिमा याञाउत्सव काळात सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनार्थ आले होते  याभाविकांचा वावर मंदीर परिसर महाध्दार मंदीरांन कडे येणाऱ्या रस्त्यावर होता यात प्रामुख्याने मंदीरा समोर श्रीफळ वाढवलेला ओला कचरा सह अन्य कचरा ट्रँक्टर ध्दारे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना उचलला व ते डंपीग  ग्राऊंडवर टाकुन याञा कालावधीत शहरात घाणीचे साम्राज्य पसरु नये यासाठी दक्षता घेतली .

याञा काळात स्वच्छता कर्मचारी संपावर!

चैञी पोर्णिमा याञा काळात  ठेकेदार कडे असणारे  रोजंदारी कर्मचारी  पगारवाढीसाठी  अचानक संपावर गेल्याने ठेकेदाराने कायम १६ व  काही  ठेकेदार चे तसेच बिहार व पुणे येथुन स्वच्छतेसाठी कर्मचारी मागवून त्यांनी चैञी पोर्णिमा याञा काळात अस्वच्छता निर्माण होवु दिली नाही.


 
Top