उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वैराग्य महामेरू श्री. संत गोरोबा काका समाधी सोहळा निमित्त तालुक्यातील वडगाव (सि.) येथील श्री. सिद्धेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार, 24 एप्रिल रोजी या सप्ताहास प्रारंभ होणार असून शनिवार, 30 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहाचे हे सोळावे वर्ष आहे.

या सप्ताहादरम्यान दररोज पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 6 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 4 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन, रात्री 11 ते पहाटे चार या काळात हरिजागर होणार आहे.

सप्ताह काळात परिसरातील नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन, प्रवचन होणार आहे. रविवार 24 एप्रिल रोजी हभप भीमराव आवटे (बामणीवाडी) यांचे प्रवचन तर हभप सुभाष गुंडगिरी महाराज (अपसिंगा) यांचे कीर्तन होणार आहे. 25 एप्रिल रोजी हभप गजानन चौगुले महाराज (उस्मानाबाद) यांचे प्रवचन तर रात्री हभप शाम भोसले महाराज (कवठा, सोलापूर) यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार, 26 एप्रिल रोजी हभप भैरवनाथ शेखर महाराज (शेरकर वाडगा) यांचे प्रवचन तर रात्री हभप दत्तात्रय भोसले महाराज (सोलापूर) यांचे कीर्तन होणार आहे. 27 एप्रिल रोजी हभप रामचंद्र कोळी महाराज (उस्मानाबाद) यांचे प्रवचन तर रात्री हभप क्षिरसागर गुरुजी महाराज (देवळाली) यांचे कीर्तन होणार आहे. 28 एप्रिल रोजी हभप सुतार महाराज (जुनोनी) यांचे प्रवचन तर हभप पांडुरंग महाराज लोमटे (धाराशिव) यांचे सकाळी 10 ते 12 या दरम्यान गुलालाचे तर रात्री हभप माऊली महाराज (मेडसिंगा) यांचे कीर्तन होणार आहे. 29 एप्रिल रोजी राम सुरवसे महाराज (आंबेवाडी) यांचे प्रवचन तर प्रमोद गुणवंत माने महाराज (अनसुर्डा) यांचे कीर्तन होणार आहे. 30 एप्रिल रोजी हभप जगन्नाथ महाराज हिंगोलीकर व हभप वैजनाथ मदने यांचे प्रवचन तर हभप नवनाथ जाधव महाराज (चिखली) यांचे सकाळी 10 ते 12 या दरम्यान काल्याचे किर्तन व हभप नवनाथ शिरसाठ महाराज सकनेवाडी यांचे अमावस्या निमित्त रात्री 7 ते 9 या दरम्यान कीर्तन होणार आहे. यानंतर भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे.

तरी या सर्व कार्यक्रमांचा वडगाव (सि.) व परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top