उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीला आज ६ एप्रील रोजी ४२ वर्षे पुर्ण झाली असून आज देशातील सर्वात बलशाली आणि मोठा पक्ष म्हणून भाजपा नावारुपास आला आहे. माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक दिग्गजांनी ६ एप्रील १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती. आज त्यांनी लावलेल्या छोटयाशा रोपटयाचे विशाल अशा वृक्षामध्ये रुपांतर झाले आहे.

 भारतीय जनता पार्टीचे आ.राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सुचनेनुसार आज जिल्हाभरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थापना दिनानिमीत्त घरावर भाजपाचे ध्वज लावुन प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाम व फलक लावून भाजपा स्थापना दिन साजरा केला.

 आज स्थापना दिनाच्या निमीत्ताने भाजपा उस्मानाबाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय येथे सकाळी ९ वाजता भाजप जिल्हाध्यक्ष  नितीन काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच याप्रसगी भारतमातेचे पुजन करुन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. नंतर भारतीय जनता पार्टीचा ध्वज घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करुन रॅली काढण्यात आली. तसेच भाजप कार्यालयात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे संबोधन थेट प्रक्षेपण चित्रीकरण दाखवण्यात आले आणि शहर तसेच ग्रामीण भागातील जेष्ठ पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासुन ते आतापर्यंतच्या सर्व प्रवासाची माहिती सांगीतली व “मला अभिमान आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचा” असे गर्वाने सांगितले.

 या कार्यक्रमास भाजपाचे सुरेश देशमुख, नेताजी पाटील, ॲड.खंडेराव चौरे, मोहन कुलकर्णी, पिराजी मंजुळे, ॲड. नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, अर्चना अंबुरे, पुजा देडे, पांडुरंग लाटे, सुनिल काकडे, राहुल काकडे, प्रविण सिरसाठे, दाजीप्पा पवार, शिवाजी पंगुडवाले, प्रविण पाठक, बालाजी कोरे, नामदेव नायकल, पुजा राठोड, देवकन्या गाडे, विनायक कुलकर्णी, संदिप इंगळे, ॲड.कुलदिपसिंह भोसले, ओम नाईकवाडी, प्रितम मुंडे, वैभव हंचाटे, मोहन मुंडे, गणेश इंगळगी, संदिप कोकाटे, नरेंद्र वाघमारे, मेसा जानराव, प्रेम पवार, शेशेराव उंबरे, रोहित देशमुख, सुनिल पंगुडवाले, विनोद निंबाळकर, अमोल पेठे, सागर दंडनाईक, स्वप्नील नाईकवाडी,  हिम्मत भोसले, सुरज शेरकर, अजय यादव, ज्ञानेश्वर सुळ, अमित कदम, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, अर्जुन पवार यांच्यासह धाराशिव शहर व ग्रामीण भागातील असंख्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top