उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महसूल सहाय्यकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.४ एप्रिलपासून उस्मानाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नायब तहसिलदार यांना देण्यात येणारे प्रमोशन दोन वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे  ते प्रमोशन देण्यात यावे यासह इतर मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

या आंदोलनात नितेश काळे, श्रीकांत अंधारे, अविनाश आडसुळे, ओमप्रकाश मेहकरे, नागनाथ राजुरे, शंभो पांचाळ, विजय पाटील, नानासाहेब मुंडे, प्रमोद चंदनशिवे, रवींद्र भांडे, राजेश पवार, बाळासाहेब खडबडे, रंगनाथ कोलगणे, दीपक चिंतेवार, रवी मोहिते, चव्हाण, शुभम काळे, प्रभाकर गायके, एस.के. गायकवाड, सिमा सिरसकर, मनोज पाटील, श्रीहरी गाढवे, महेंद्र कुलकर्णी, सुवर्णा पतंगे, धनश्री अंकुशे, प्रभाकर उंबरे, बालिका चौरे, ढवळे, अमरदीप शिंदे, ज्योतीराम देवकर, गोविंद शेटे, बजरंग केंद्रे, दत्ता पवार, सुधाकर साबळे आदीसह इतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.


 
Top