उस्मानाबाद / प्रतिनिधी-
पेट्रोल डिझेलवरील राज्यसरकारने लावलेला टॅक्स कमी करून इंधनाच्या वाढलेल्या किमतीत दिलासा द्यावा या मागणीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या सूचनेनुसार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज (दि.4) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदारपणे निदर्शने करण्यात आली. ठाकरे सरकार मधील दररोज चव्हाट्यावर येणार्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणापासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी शिवसेना व आघाडी सरकारचे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टिका यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केली.
या आंदोलनात पांडुरंग लाटे, अभय इंगळे, पांडुरंग आण्णा पवार, अर्चना अंबुरे, इंद्रजित देवकते, पुजा देडे, दाजी अप्पा पवार, प्रविण पाठक, अमोल पेठे, सुजित साळुंके, वैभव हंचाटे, मोहन मुंडे, संदिप इंगळे, प्रवीण सिरसट, सुनिल पंगुडवाले, पृथ्वीराज दंडनाईक, दाजी अप्पा पवार, सचिन लोंढे, राहुल शिंदे, विद्या माने, देवकन्या गाडे, ओम नाईकवाडी, राज निकम, अमित कदम, हिम्मत भोसले, स्वप्नील नाईकवाडी, मेसा जानराव, अॅड. कुलदिपसिंह भोसले, प्रीतम मुंडे, ओमकार देशमुख, सुनिल पंगुंडवाले, जगदिश जोशी, प्रसाद मुंडे, सागर दंडनाईक, दादुस गुंड, सार्थक पाटील, अजय उंबरे, ज्ञानेश्वर पडवळ, ज्ञानेश्वर शिंदे, नरेन वाघमारे, ज्ञानेश्वर सुळ, युवराज घोडके, धनराज नवले, अक्षय भालेराव, रोहित देशमुख, अर्जुन पवार, गणेश इंगळगी, गीरीष पानसरे, अजय यादव, उदय देशमुख, शंकर मोरे, आकाश सलगर, मोनु पाटील व सर्व युवा मोर्चा, महिला मोर्चा, एस.सी.मोर्चा, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.