तुळजापूर / प्रतिनिधी-

 बंजारा ‌समाजाची संस्कृती व गौरवशाली इतिहास हा समाजाला पुढे नेईल मी सदैव बंजारा समाजाच्या पाठिशी राहिन, असे आवाहन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आमदार निलय नाईक यांनी केले.   

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे जागतिक बंजारा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर विधान परिषदेचे आमदार दुष्यंतचंद चतुरर्वेदी, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, अमृता चव्हाण, माणिकराव चव्हाण, डॉ.सुरज चव्हाण, शेषेराव चव्हाण उपस्थित होते. तर‌ कार्यक्रमास आलियाबादच्या सरपंच ज्योतीका चव्हाण, रामतीर्थ सरपंच बालाजी राठोड, लक्ष्मण राठोड, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, पांडुरंग चव्हाण, दामाजी राठोड ,ग्रा.प.सदस्य कुमार राठोड, रामचंद्र पवार,विनायक चव्हाण,थावरु राठोड, सुभाष नाईक ,शिवाजी चव्हाण, नामदेव नाईक,नेमिनाथ चव्हाण,शंकर राठोड, गणेश राठोड, सिद्राम पवार, सुभाष चव्हाण,हरीदास चव्हाण, गोविंद राठोड, देविदास चव्हाण,भिल्लू राठोड,कांत पवार,बाबु जाधव,नेमिनाथ राठोड,माणिक राठोड, सुर्यकांत चव्हाण, संतोष चव्हाण, अमोल चव्हाण, शिवाजी चव्हाण सन्नी चव्हाण , नागेंद्र गुरव, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी नाईक यांनी केले तर आभार विनायक राठोड यांनी मानले.

 
Top