उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी  सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उस्मानाबाद जिल्हयात 10 एप्रिल हा राष्ट्रीय भूमापन दिन भूमि अभिलेख विभाग व लोकप्रतिष्ठाण संस्थेच्या सहकार्याने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 

 या कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी उप जिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी  हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गणेश माळी, ज्येष्ठ फिजीशियन, समुपदेशिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्या, लोक प्रतिष्ठाण संस्थेच्या, श्रीमती.डॉ. स्मिता शहापुरकर,उपअधीक्षक भूमि अभिलेख अशोक माने, उमरगा येथील भूमि अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती. वैशाली गवई, विभागीय कास्ट्राईब भूमि अभिलेख संघटनचे कार्यध्याक्ष  राहुल राऊत हे उपस्थित होते.  

 या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आली. तदनंतर कार्यालयातील पुरातन काळात वापरात असणा-या  तसेच अत्याधुनिक मोजणी साहित्याचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात  माने व श्रीमती. वैशाली गवई यांनी भूमापन दिना बाबत विस्तृत अशी माहिती  दिली.

 तहसीलदार श्री. माळी आणि लोक प्रतिष्ठाण संस्था,  श्रीमती.डॉ. स्मिता शहापुरकर, यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. स्मिता शहापुरकर यांनी भूमि अभिलेख विभागातील कर्मचारी यांना आरोग्य विषय मार्गदर्शन केले. तसेच कर्मचा-यांच्या आरोग्य विषय प्रश्नांना ही उत्तरे दिली. तसेच वाढत्या वयात वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे बाबत सूचीत केले. 

 यावेळी भूमि अभिलेख विभागातील महत्वकांक्षी प्रकल्प ड्रोन सर्व्हे मध्ये विशेष परिश्रम घेणा-या उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच पांदण रस्ते मोजणीचे काम उत्कृष्ट पणे केल्याबद्यल  कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक व आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात अत्याधुनिक मोजणी साहित्या ई.टी.एस. मशीन आणि रोव्हर बाबत  प्रशांत सगर यांनी  प्रात्याक्षिकासह मोजणी बाबत विस्तृत अशी माहिती  दिली.  अविनाश पाटील यांनी मिळकत पत्रिका  ई फेरफारबाबत  प्रात्याक्षिकासह विस्तृत अशी माहिती  दिली. तसेच यावेळी  कर्मचाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात पुरातन काळात वापरात असणा-या  आणि अत्याधुनिक मोजणी साहित्याचे प्रदर्शनही  भरवण्यात आले होते. तसेच  1892 पासूनचे मूळ अभिलेखे  जनतेस पाहण्यास उपलब्ध करुन देण्यात आले होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अविनाश पाटील, श्रीमती. धोंगडे यांनी केले तर आभार  राहुल राऊत यांनी मानले. 

या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख  कार्यालयाचे कार्यालय अधिक्षक  आसेफ मोमीन, श्री. के.व्ही. कुलकणी व जिल्हयातील सर्व भूमि अभिलेख विभागाचे कर्मचारी हे उपस्थित होते.  हा कार्यक्रमाचे यशस्वी करणेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 
Top