उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हारूग्णालयासह जागा हस्तांतरीत करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सामंजस्य करार होणे आवश्यक असते. परंतू सामंजस्य करार न होताच भाजपा व शिवसेनेने  सामंजस्य करार झाल्याचे जाहीर केले होते. यावरून भाजपा-सेनेच्या नेत्यामध्ये पत्रकांच्या माध्यमातुन शाब्दीक चकमक सुरू झाली आहे. 

भाजपाच्या वतीने माध्यमांना मेल पाठवून शैक्षणीक वर्ष २०२२-२३ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यासक्रम सुरू होण्याबाबतच्या या प्रेसनोटमध्ये सततच्या पाठवुराव्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डा.प्रदीप व्यास यांची काल सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली असून आता हा विषय मुख्यताह वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुपूर्त झाला आहे असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेषम्हणजे यानंतर भाजचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रेस नोट काढून सामंजस्य करारावर अद्याप स्वाक्षरी नाही, चुकीची माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मांगा, अशी मागणी केली आहे.

 भाजपच्या शाब्दीक हल्यानंतरत शिवसेनेच्या सतीश साेमाणी यांनी पत्रक काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतय उस्मानाबादला अन् धुर निघतो नेरूळमधुन अशी टिका करत सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्या आधीच प्रसिध्दीच्या लालसेपोटी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग भाजप आमदार करीत असल्याची टिका सोमाणी यांनी केली आहे. 


 
Top