परंडा / प्रतिनिधी : - 

मौजे ढगपिंपरी ता.परंडा येथील शिवाजी मालोजी गरड यांचा शेतात काम करताना सर्पदंशाने बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू १४ जुलै २०२१ रोजी झाला होता.मयत शिवाजी गरड यांनी २०१९-२० साली भारतीय स्टेट बॅंक शाखा परंडा या बॅंक मधून शेतकरी अधिकारी यांनी पिक कर्जाची माहिती देऊन शिवाजी गरड यांना पिक कर्ज देऊन पुन्हा २०२०-२१ रोजी नुतनीकरण ची माहिती देऊन पिक कर्जातील फाईल मध्ये SBI जनरल इन्शुरन्स पॉलिसी वयक्तीक अपघाती विमा १००० रू रिनीव्ह करून सदरील पॉलिसी वाहन अपघात, नैसर्गिक अपघात, सर्पदंश इ. साठी लागु होतो आणि हीच १००० ची पॉलिसी क्लेम २० लाख रुपये होती याचाच फायदा शिवाजी गरड यांच्या कुटुंबातील सदस्यांना झाला. 

    मयत शिवाजी गरड यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्यासाठी तब्बल १० ते १२ लाख रुपये खर्च करून देखील अपयश आले नाही गरड कुटुंबातील आधीच हालाखीची परिस्थिती जेमतेम जनवारे, शेती व कुटुंबातील ४ सदस्य यांचा मोठा हातभार होता. परंतु शिवाजी गरड यांच्या मृत्यूनंतर कर्जाचा डोंगर उभारला जमीन विकण्याचा निर्णय घेतला त्यातच दुर्देवाने भारतीय स्टेट बॅंक शाखा परंडा यांच्या पॉलिसीने गरड कुटुंबातील सदस्यांना २० लाखाची मदत झाली त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी रिजनल मॅनेजर विलास शिंदे, मॅनेजर निलेश बोंबले व भारतीय स्टेट बँकेच्या शेतकरी अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

   मयत शिवाजी गरड यांचा मुलगा गणेश गरड यांना दहावी नंतर शिक्षणापासून वंचित राहवे लागले परंतु गणेश च्या दोन्ही बहिणी रूपाली व दिपाली आई स्वाती शिवाजी गरड यांनी त्यांचे शिक्षण चालू ठेवले‌ गरड कुटुंबातील सदस्यांना सांत्वन भेट दिली. 

यावेळी भारतीय स्टेट बॅंक चे मॅनेजर निलेश बोंबले, शेतकरी अधिकारी समन्वयक अभयसिंहराजे मोहीते, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, समन्वयक महेश पाटील उपस्थित होते.


 
Top