उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणीक वर्षांपासून सुरू होणार असा बोलबाला चालू असानाच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी मेडीकल कॉलेजच्या प्रक्रियेसाठी आरोग्य विभाग व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांनी करारच केला नसल्याची माहिती दिली. या संदर्भात आ.कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या ८ ते १० दिवसात आरोग्य विभाग व उच्च तंत्र शिक्षण विभाग याचा करार होईल, त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल त्यावेळेस  केद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने त्वरीत मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा आ.पाटील यांनी  व्यक्त  व्यक्त करून येत्या शैक्षणीक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील पुर्ण तयारी शासकीय रूग्णालय परिसरात झाली असल्याचे सांगितले. . 

उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री आमित देशमुख,  पर्यटनमंत्री आिदत्य ठाकरे, पालकमंत्री गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी अथक परिश्रम केले आहेत.  विशेष म्हणजे आ.राणाजगजिसिंह पाटील यांनी ही वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न केला आहे.  त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा पहाणे, स्टाफची भरती करणे, तात्पुर्ते वैद्यकीय महाविद्यालय कुठे सुरू करणे आदी कामे गतीने होत आहेत. विशेष म्हणजे येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी कायमस्वरूपी अधिष्ठ्ता यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. नुकतीच वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासह मंुबई येथे उच्च पातळीवर  बैठक झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार अशी अशा निर्माण होऊन उस्मानाबादकरांच्या  अपेक्षा उंचावल्या होत्या. 

जागेचा मुद्दा वादग्रस्त

वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय व परिसरात योग्य जागा असल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तर लोकप्रतिनिधीमध्ये जागेवरून मतभेद निर्माण झाले आहेत. गावसूद रोडला वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा पाहण्यात आली होती. परंतु या परिसरात खादानी व लोकांच्या दृष्टीकोनातून गैरसोईचे असल्याचा मत प्रवाह असल्याने कांही लोकप्रतिनिधींनी यास विरोध केला. तर शासकीय आयटीआय परिसरात २० एकर जागा उपलब्ध होऊ शकते ती जागा योग्य असल्याचा अग्रह कांही लोकप्रतिनिधींचा आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नेमकी कोणती जागा फायनल करण्यात आलेली आहे. यावरून करार लाबणीवर पडल्याची माहिती दिली जात आहे. 

करार नसल्याचे स्पष्टीकरण

उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश निती आयोगाच्या अहवालानुसार, आकांक्षीत जिल्हयात झाल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचा जिल्हयात नुकताच दौरा झाला. या दौऱ्यात पत्रकारांनी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे नजरेस आणून देऊन वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपलब्धता होऊ शकते, असे सांगितले. यावर डॉ.भारती पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्रीयेसाठी आरोग्य विभाग व उच्च तंत्र शिक्षण विभागाने अद्याप करार केला नसल्याचे सांगितले. कराराची प्रक्रिया व अन्य बाबी राज्य सरकार ने पुर्ण केल्यानंतर तातडीने केंद्र शासनाच्या वतीने परवानगीची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे, असे डाॅ. पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते. 

येत्या शैक्षणीक वर्षांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार

येत्या शैक्षणीक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, प्रथम वर्ष अभ्यासक्रम शासकीय रूग्णालय परिसरात चालू करण्यासंदर्भात सर्व तयारी झाली आहे. उच्च तंत्र शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांचा करार फायनल  स्टेजवर आहे. येत्या ८ ते १० िदवसात सर्व कांही होईल, ज्या वेळेस राज्य सरकारकडून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाईल, त्यावेेळेस त्यांनी त्वरीत मान्यता देणे गरजेचे आहे. सिंधदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारकडून आजून मान्यता मिळाली नाही. केंद्राची टीम   ८ वेळेस पहाणी  करण्यासाठी येऊन गेले.  त्यामुळे डॉ.भारती पवार यांनी राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर सहकार्य करावे, अशी अपेक्षा अामदार कैलास पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. 


 
Top