उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री   डॉ. भारतीताई पवार यांनी उस्मानाबाद येथील स्त्री रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर झालेल्या बैठकीत आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंती प्रमाणे जिल्हा रुग्णालय येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत अधिकच्या ६० प्रसूती आणि स्त्री रोग च्या खाटा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या बरोबर  झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने या खाटा दोन महिन्याच्या आत कार्यान्वित होण्याची अपेक्षा असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

 जिल्हा रुग्णालयात प्रसूती आणि स्त्री रोग विभागासाठी जागा ठरली असून महाविद्यालयाच्या मंजूर पदांमध्ये ९ स्त्री रोग तज्ञांचा समावेश आहे. त्याची भारती प्रक्रिया सुरु असून येत्या दोन महिन्यात स्त्री रोग तज्ञ तसेच प्रसूती आणि स्त्री रोगच्या अधिकच्या ६० खाटा कार्यान्वित होतील. डॉ. भारती पवार यांच्या भेटी दरम्यान झालेल्या अनेक निर्णयांपैकी हा एक महत्वाचा विषय मार्गी लागला असून याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. 


 
Top