उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात तीस दिवसीय कौशल्य विकास शिबीराचे दि. 20 एप्रिल रोजी मा प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन करण्यात आले.

 महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या आणि राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड कंपनी व ऑप्टीमल स्कील अॅन्ड सोल्यूशन फाऊंडेशन हैद्राबाद यांच्या सयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थांना तीस दिवसीय कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये स्पोकन इंग्लिश, संगणकाचे विविध कोर्सेस, व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

प्रशिक्षण शिबीराची तीस दिवसाची रूपरेषा स्पर्धा परीक्षा केंद्राचे समन्वयक डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी यावेळी विद्यार्थ्यIना सांगितली. 

  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन ऑप्टीमल स्कील अॅन्ड सोल्यूशन फाऊंडेशन चे प्रकल्प समन्वयक मा. प्रमोद पवार  तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रा.डी.एम. शिंदे हे लाभले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदिप देशमुख यांनी केले.तर आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.

  प्रशिक्षण शिबीर हे महाविद्यालयाच्या वेळेनंतर सुरू होणार असल्याने व हे शिबीर महाविद्यालयातील विद्यार्थ्याना मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेले असल्याने महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

 सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top