उस्मानाबाद (प्रतिनिधी) -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 मे रोजी औरंगाबाद येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे. या सभेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते औरंगाबादला जाणार असल्याची माहिती मनसचेे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी दिली.
राज्यात झालेले सत्तापरिवर्तन, दोन वर्षाचा कोविड काळ आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांसह सध्याचा मशिदींवरील भोंग्यांच्या ज्वलंत प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात मनसेचे पदाधिकारी बैठका घेऊन मेळाव्याला औरंगाबाद येथे जाण्यासाठी नियोजन करत आहेत. प्रदीर्घ काळानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौर्यावर येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हा मेळावा रेकॉर्डब्रेक होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गपाट यांनी म्हटले आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड, जिल्हा सचिव दादा कांबळे, तालुकाध्यक्ष पाशा शेख, गोपाळ घोगरे, शिवनाथ ढोरमारे, अजय तांबिले विक्रम गपाट आदींनी केले आहे.