उस्मनाबाद (प्रतिनिधी )

 लोकमंगल फाउंडेशन च्या वतीने रविवार दिनांक 27 मार्च रोजी छाया दीप मंगल कार्यालय जिल्हा दूध संघ समोर औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रोहन देशमुख यांनी दिली. 

“विवाह” हा एक जीवनातील महत्त्वाचा टप्पा तो पार असताना समाजातील सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विवाहवेळी येणाऱ्या अडचणी नाहक होणाऱ्या पैशांची उधळण, जाचक हुंडापद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून  रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेकवर्षांपासून   लोकमंगल फाऊंडेशन च्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत आहोत. आजपर्यंत सोलापूर व उस्मानाबाद मध्ये गेल्या 16 वर्षापासून जवळपास  3000 जोडपी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत.  यंदाही  लोकमंगल फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षीप्रमाणे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 27 मार्च रोजी छाया दीप मंगल कार्यालय औरंगाबाद रोड उस्मानाबाद येथे हा विवाहसोहळा दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी   होणार आहे .  तरी या सर्व विवाह सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन रोहन देशमुख यांनी केले आहे.


 
Top