उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उद्या दि.27 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दुपारी 02.30 वाजता लातूर येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण.दुपारी 03.30 वाजता तुळजापूर येथे आगमन व दर्शनासाठी राखीव.सायंकाळी 04.30 वाजता तुळजापूर येथून मोटारीने उमरगा जि. उस्मानाबादकडे प्रयाण.सायंकाळी 05.30 वाजता उमरगा जि.उस्मानाबाद येथे आगमन.सायंकाळी 05.30 वाजता भारत शिक्षण संस्था,उमरगा व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा,ता.उमरगा जि.उस्मानाबाद तर्फे आयोजित विविध समारंभास उपस्थिती.(स्थळ: श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय,उमरगा जि.उस्मानाबाद) रात्री 08.30 वाजता उमरगा येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण.