उस्मानबाद (प्रतिनिधी )

शहरातील जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्याच्या कामाला शनिवारी (दि.26) प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत रस्ताकामाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शिवसेनेचे संजय उर्फ पप्पू मुंडे, माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे, रवि वाघमारे, पंकज पाटील, बाळासाहेब काकडे, दिनेश बंडगर, सुरेश गवळी, नेताजी राठोड, वैभव उंबरे, अमित उंबरे, प्रशांत साठे, दिनेश उंबरे, अभि देशमुख, सुमित बागल, श्रीकांत चव्हाण आदीसह नागरिक उपस्थित होते. या कामामुळे जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक भागातील रहिवाशांची खड्डे आणि धुळीपासून मुक्तता होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

 
Top