उस्मानाबाद (प्रतिनिधी)

यशवंतराव चव्हाण यांचा स्वातंञ्य चळवळीत सहभाग होता त्यामुळे देशाभिमान त्यांच्यात होता ते दूरदृष्टी राजकारणी असल्याने त्यांनी महाराषट्र राज्याचा मुख्यमंञी म्हणून यशस्वी धुरा सांभाळली त्यामुळेच आपल्या राज्याची आर्थिक व सामाजिक उंन्नती झाली त्यांनी आर्थीक व शैक्षणिक धोरणे यशस्वीपणे राबवल्याने आज त्यांचाच आदर्श ठेऊन नेते कार्य करतात त्यांचे कार्य लौकिक स्वरूपाचे होते असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण म.मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात १२मार्च रोजी,माजी मुख्यमंञी यशवंतराव चव्हाण यांचे जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात समाजशास्ञ विभागाचे प्रमूख व केंद्रसंयोजक प्रा.डी.एम.शिंदे यांनी केले आहे.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.प्रारंभी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिमाचे पुजन केले.

अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,यशवंतराव  चव्हाण यांचे कार्य अफाट होते मराठवाड्याचा विकास व्हावा यासाठी त्यांनी खास बाब म्हणून मराठवाड्याला विद्यापीठ दिले आणि आज डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चांगले कार्य करत असून अनेक समाजातील गोर,गरिब विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेञात झेप घेत आहेत.त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन त्यांचे सुसंस्कारित विचार शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहचवले पाहिजेत

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक उपस्थित होते.आभार केंद्र सहाय्यक ज्ञानेश्वर बारवकर यांनी मानले.


 
Top