उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नाम फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १२० शेतकरी कुटुंबास ३० लाख रुपयाची आर्थिक मदत उस्मानाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.

शहरातील  साईिलला सभागृहात शुक्रवारी (दि.१२) मदत वाटपचा कार्यक्रम  घेण्यात आला. कार्यक्रमास  पत्रकार  धनंजय रणदिवे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, उद्योजक दत्तात्रय पाटील, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचे नाम फाऊंडेशनचे समन्वयक डॉ. हर्षवर्धन राऊत, मुकुंद उंबरे, अमोल पाटील व अनंत लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात जिल्ह्यातील १२० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना प्रत्येकी २५ हजार रुपयाची आर्थिक मदत मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. ही संपूर्ण मदत धनादेशद्वारे देण्यात आली. या मदतीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियास गहिवरून आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास माहिती पोहचवण्यासाठी तालुका समूह संघटक,  प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील  गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचे सहकार्य लाभले.


 
Top