तुळजापूर/ प्रतिनिधी-  

नगरपरिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन नगरपरिषदेचा कराचा भरणा करणे सुलभ व्हावे यासाठी (मालमत्ता कर नळपट्टी व इतर कर) ऑनलाइन पेमेंट सुविधा आज पासून उपलब्ध करून देण्यात आली याचे उद्घाटन  सोमवार  वैभव अंधारे, वसुली प्रमुख यांनी केले.

 यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपयोग करून लाभ घ्यावा, असे आवाहन सदर मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी श्री. वैभव अंधारे, वसुली प्रमुख यांनी केले .   सदर उपाययोजना करणे कामी प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी  योगेश खरमाटे, मुख्याधिकारी हरीकल्याण येलगटे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. सदर सुविधा उपलब्ध करून देण्यास श्री.कृष्ण काळे, लेखापाल व राहुल मिटकरी अंतर्गत लेखा परीक्षक नगरपरिषद तुळजापूर यांचेही सहकार्य लाभले.

 
Top