तुळजापूर/ प्रतिनिधी-  

 तालुक्यातील सांगवीमार्डी येथील  आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवेस घर नसताना पक्के घर असल्याचे दाखवुन सदरील विधवा महिलेस प्रधानमंञी आवास योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडल्याने सर्वञ आश्चर्य : व्यक्त केले जात आहे.

 या बाबतीत अधिक माहीती अशी की, सांगवी मार्डी येथील रहिवाशी असलेल्या  शिल्पा अकुंश बागल या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा  असुन त्यांनी  प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलसाठी अर्ज केला होता . मात्र माझ्या नावे कुठल्याही घराची नोंद नसताना माझे नावे पक्के घर आहे, असे दाखवुन मला अपात्र ठरवण्यात आले  तसेच या यादित गंभिर चुका असुन याबाबत परत सर्व्हे करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा व ह्याबाबत योग्य ती कारवाई करावी , अशी मागणी सांगवी मार्डी येथील  शिला अंकुश बागल यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.

 
Top