तुळजापूर / प्रतिनिधी-
युवासेना सचिव वरूणजी सरदेसाई यांनी सोमवार दि. २८रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन श्री आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
निश्चय दौराच्या माध्यमातून व महाराष्ट्रातील युवा सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांना न्याय व हक्कासाठी युवा सेनेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करण्यासाठी आई भवानीला आशीर्वाद मागितला व महाराष्ट्रातील युवक व युवती यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने केलेले कामे सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचविण्याचे कार्य निश्चय दौऱ्याच्या माध्यमातून युवा सेना करीत आहे, असे यावेळी म्हणाले .
यावेळेस युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखन कदम परमेश्वर, तुळजापूर युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे, शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील जाधव, संजय भोसले. शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, युवासेना आयटी सेल तालुकाप्रमुख मालोजी भोसले, प्रेम कदम .प्रसाद उडरे, सर्वेश चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.