परांडा /प्रतिनिधी : - 

समाजासाठी काम करण्याची प्रवृत्ती राष्ट्रीय सेवा योजना मुळे निर्माण होते असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा गे शिंदे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ महेशकुमार माने यांनी तालुक्यातील मौजे रुई येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समारोप समारंभामध्ये अध्यक्ष समारोप करताना वरील उद्गार काढले .

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन दिनांक 19 मार्च ते 25 मार्च दरम्यान श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता व जलसंवर्धनासाठी युवा या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 या समारोप समारंभप्रसंगी येथील सरपंच श्रीमती कुसुम जगताप ,उपसरपंच श्री पाटील तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश सरवदे, प्रा अमर गोरे पाटील, प्रा डॉ संभाजी  गाते, प्रा डॉ प्रशांत गायकवाड, प्रा डॉ अरुण खर्डे, प्रा डॉ विशाल जाधव, प्रा डॉ अतुल हुंबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण प्रा सचिन साबळे, महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, ब्रॉडकास्टिंग व पत्रकारिता विभागाचे नोडल अधिकारी प्रा संतोष काळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये जलसंवर्धन, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान शिबीर, ग्रामस्वच्छता ,व्यक्तिमत्व विकास, महिला सबलीकरण व व्यसनमुक्ती आधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .यादरम्यान परंडा येथील डॉ आनंद मोरे ,डॉ शहाजी चंदनशिवे, डॉ विद्याधर नलवडे ,डॉ प्रकाश सरवदे यांनी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.भगवंत ब्लड बँक बार्शी येथील कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहकार्य केले.शिबिरांमध्ये एकूण 31  दात्यांनी  रक्तदान केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी रुई येथील ग्रामस्थ, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.यामध्ये उत्तम माने, हनुमंत मार्तंडे आणि श्रीमती सुनंदा कोठुळे यांनी प्रत्यक्ष शिबिरामध्ये सहकार्य केले.


 
Top