तुलजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील कदमवाडी येथील ट्रँक्टर ने तिर्थक्षेञ  पंढरपूरला  एकादशीनिमित्ताने  निघालेल्या वारकऱ्यांवर सोलापुरातील कोंडी गावाजवळ वारक-यांच्या  ट्रँक्टरला ट्रक ने धडक दिल्याने यात ट्रँक्टर मधील चार वारकरी ठार झाले व सहा गंभीर जखमी झाले असुन या घटनेने कदमवाडी गावावर शोककळा पसरली आहे.मृतांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. 

 तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील हे रहिवाशी असून एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. ते  सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावजवळ आले असता.  मालट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या ट्रँक्टर मध्ये एकूण 22 प्रवासी होते. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवाशी आहेत.  

अपघातातमध्ये  तुकाराम सुदाम शिंदे (वय 13), ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (वय 14 ), भागाबाई जरासंद मिसाळ (वय 60),जरासंद माधव मिसाळ (वय 70) अशी मृतांची नांवे आहेत.     दरम्यान अपघाताला कारणीभूत असलेल्या व्यक्ती विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी केली आहे.    अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघात स्थळावरुन जखमींना तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तसेच, सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातातील दोन्ही वाहानं रस्त्यावरुन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. कदमवाडी गावात सांयकाळी मृतदेह आणल्यानंतर सांयकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top